व्यवसाय संघटनेची स्वरूपे ( एकल व्यापार )
व्यवसाय संघटनेची स्वरूपे : ( १ ) एकल व्यापार ( २ ) भागीदारी ( ३ ) संयुक्त स्कंध प्रमंडळ ( ४ ) सहकारी संस्था प्रश्न : एकल व्यापार म्हणजे काय ? त्याची वैशिष्टय आणि गुण-दोष विशद करा. एकल व्यापार : (Sole Trade) : एकल व्यापार किंवा व्यक्तिगत व्यापार हे व्यवसाय संघटनेचे प्रारंभिक स्वरूप होय , व्यवसायाचे एका विशिष्ट पद्धतीने संघटन करण्याची पद्धती इथूनच रूढ झाली . एकल व्यापार पद्धतीत व्यवसाय करण्यासाठी हवे असलेले भांडवल गोळा करणे , व्यवसायाचे संचालन करणे व व्यवसायातील जोखीम स्वीकारणे ही सर्व कार्ये एकच व्यक्ती करीत असते . अशा व्यक्तीला एकल व्यापारी (Sole Trade) असे म्हणतात व अशा व्यक्तीने सुरू केलेला व्यापार म्हणजे ' एकल व्यापार ' (Sole Trade) होय . व्यवसायाचे संघटन करण्यासाठी जेव्हा एकाच व्यक्तीचे प्रयत्न व परिश्रम कारणीभूत ठरतात, तेव्हा त्या पद्धतीला एकल व्यापार किंवा व्यक्तिगत व्यापार असे म्हणतात. ह्या व्यापारात होणाऱ्या नफा किंवा नुकसानीची जबाबदारी त्या एका व्यक्तीलाच स्वीकारावी लाग...