त्रि-क्षेत्रीय सिद्धांत


प्रश्न : त्रि-क्षेत्रीय सिद्धांत स्पष्ठ करा ? 

उत्तरव्यावसायिक क्षेत्रात वस्तूंचे आणि सेवांचे उत्पादन करणाऱ्या नफ्याच्या उद्देश असणाऱ्या संस्था अंतर्भूत आहेत. ह्या संस्था उत्पादनाच्या संदर्भात असणाऱ्या चार उत्पादक घटकांच्या सेवा एकत्रित करीत असतात, ज्या उत्पादनाचे कार्य सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी देशी क्षेत्राकडून मिळविल्या जातात. व्यावसायिक क्षेत्र अस्तित्वात असणाऱ्याचा प्राथमिक मूलभूत उद्देश हा देशांतर्गत ग्राहक क्षेत्राच्या आवश्यकता आणि गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंचे उत्पादन करणे हा आहे. सर्वसामान्यपणे अर्थव्यवस्थेत चार उच्चस्तरीय क्षेत्रांचा अंतर्भाव होत असतो, जे त्यानंतर लहान लहान क्षेत्रात विभागल्या जातात. अर्थव्यवस्थेमधील चार उच्चस्तरीय क्षेत्रांपेक्षा पहिले क्षेत्र हे प्राथमिक क्षेत्र (Primary Sector) म्हणून ओळखले जाते, ज्यात निस्सारण (Extraction) आणि पिकांची कापणी (harvesting) यासारख्या जमिनीपासून मिळणाच्या उत्पादनाचा समावेश केला जातो. ह्या क्षेत्रात शेती, खाणी आणि जंगले ह्या क्षेत्रांचा समावेश केला जातो. त्यानंतरचे दुसरे क्षेत्र म्हणजे दुय्यम क्षेत्रात (Secondary Sector) प्रक्रिया उत्पादन आणि बांधकाम यासारख्या क्षेत्रांचा अंतर्भाव केला जातो. तिसऱ्या क्षेत्रात (Tertiary Sector) किरकोळ विक्री, करमणूक, वित्तीय सेवा अशाप्रकारच्या विविध सेवा पुरविणाऱ्या क्षेत्रांचा अंतर्भाव केला जातो. चवथे क्षेत्र अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने वैकल्पिक क्षेत्र आहे, ते क्षेत्र म्हणजे चवथे क्षेत्र (Quaternary Sector) असून ह्या क्षेत्रात शैक्षणिक व्यवसायासारख्या बौद्धिक क्षेत्राचा अंतर्भाव केला जातो.

 त्रि-क्षेत्रीय सिद्धांत :(Three Sector Theory):

त्रि-क्षेत्रीय सिद्धांत हा आर्थिक सिद्धांत असून जो अर्थव्यवस्थेला कार्यांच्या तीन क्षेत्रात विभागतो. ते तीन क्षेत्र म्हणजे

(i) निस्सारण (प्राथमिक क्षेत्र), (ii) उत्पादन/निर्मिती (दुय्यम क्षेत्र) आणि (iii) सेवा (तृतीय क्षेत्र). त्रि-क्षेत्रीय सिद्धांताचा विकास अॅलन फिशर (Allan Fisher), कोलिन क्लर्क (Colin Clark) आणि जीन फोरेस्टी (Jean Fourastie) ह्या तिघांनी केला. त्रि-क्षेत्रीय सिद्धांतानुसार आर्थिक क्रियांचा दृष्टिकोन हा प्राथमिक क्षेत्राकडून (Primary Sector) दुय्यम क्षेत्राकडे (Secondary Sector) अंतिम तृतीय क्षेत्राकडे (Tertiary Sector) असा क्रमाक्रमाने बदलत जातो. जीन फोरेस्टीने केलेल्या पाहणीत त्याला असे दिसून आले की, ही क्रिया अत्यंत सकारात्मक अशी आहे आणि त्याने असे म्हटले आहे की, ही बाब जीवनाची गुणवत्ता, सामाजिक सुरक्षा, शिक्षण आणि संस्कृतीचा बहर, शिक्षणाचा उच्च स्तर, कामात मानवतावाद आणि बेरोजगारी टाळणे ह्यात निश्चितच वाढ करेल.

1.प्राथमिक क्षेत्र (Primary Sector)

व्यवसायाचे प्राथमिक हे असे क्षेत्र आहे कि ज्यात नैसर्गिक संसाधनांचा  अंतभाव केला जातो. ह्यात शेती , वने , जंगले , मासेमारी ,खाणी इ.  नैसर्गिक संसाधने अंतर्भूत आहेत. अविकसित देशात आणि ज्या देशात औद्योगिकीकरणाचा विकास झालेला नाही, अशा देशात प्राथमिक क्षेत्र हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत अधिक महत्त्वाचे आहे. कच्चा माल गोळा करणे, त्यावर प्रक्रिया करणे, त्याला स्वच्छ करणे, तो व्यवस्थित बांधून त्याचे संवेष्टन करणे अशा प्राथमिक उत्पादकांच्या संदर्भात असणाऱ्या प्राथमिक उद्योगांचा/व्यवसायांचा या क्षेत्रात समावेश केला जातो. हे क्षेत्र त्या वेळेस अधिक महत्त्वाचे ठरते, ज्या वेळेस मिळालेला कच्चा माल हा प्रक्रियेकरिता दूरवर वाहून नेणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नाही. प्राथमिक क्षेत्र हे विकसनशील देशात अधिक महत्त्वपूर्ण ठरते. ह्या क्षेत्रात नैसर्गिक संसाधनांपासून कच्ची सामग्री मिळविणे ही बाब अंतर्भूत आहे. जसे : खाणीतून कोळसा आणिधातू काढणे, जमिनीतून तेल काढणे, जंगलातील झाडांपासून रबर मिळविणे, शेतजमिनीतून अन्नधान्य, फळफळावळे मिळविणे तसेच मासेमारी ह्या व्यवसायाला/उद्योगाला निस्सारक उद्योग (Extractive Industry) असे म्हणतात.

2.दुय्यम क्षेत्र : (Secondary Sector):

दुय्यम क्षेत्र हे तयार वस्तू उत्पादित करणे, उपभोग्य वस्तू उत्पादित करणे किंवा बांधकाम करणे ह्या उद्योगांच्या औद्योगिक क्षेत्राशी संबंधित आहे. हे क्षेत्र साधारणत: प्राथमिक क्षेत्रातून उत्पादित झालेला माल कच्चा माल म्हणून वापरूनत्यावर   निर्माणी प्रक्रिया करून तो उपभोगक्षम बनविते किंवा इतर व्यवसायांसाठी उपयोगात येणारा कच्चा माल म्हणून त्याचे उत्पादन करते. हा उत्पादित माल एकतर देशातील उपभोक्त्यांच्या उपयोगाचा असतो, त्यामुळे त्याची देशातील उपभोक्त्यांना विक्री केली जाते किंवा तो माल  दुसऱ्या देशात निर्यात केला जातो. हे क्षेत्र मुख्यतः हलके उद्योग आणि जड उद्योग अशा दोन भागात विभागल्या जाते. ह्यापैकी बऱ्याच निर्माणींना खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जा लागत असल्यामुळे ते खूप ऊर्जा घेतात. आणि मोठ्या निर्माणींना कच्च्या मालाचे तयार मालात रूपांतर करण्याकरिता अवजड यंत्रसामग्रीची गरज भासते. ह्या जड निर्माणी मोठ्या प्रमाणात क्षेत्र सामग्री आणि उष्णता निर्माण करीत असल्यामुळे वातावरणासंबंधात अनेक प्रश्न निर्माण करतात किंवा वातावरण दूषित करून प्रदूषण निर्माण करतात. दुय्यम क्षेत्र हे प्राथमिक क्षेत्र तसेच तृतीय क्षेत्राला पाठबळ देत असते. ह्यात तेलापासून प्लॅस्टिक तयार करणे, सुतापासून कापड तयार करणे, रस्ते बांधणे, घरे बांधणे, यंत्रे तयार करणे इत्यादी उद्योगांचा अंतर्भाव होतो.

3.तृतीय क्षेत्र/सेवा क्षेत्र : (Tertiary Sector/Service Sector) :

तृतीय क्षेत्र किंवा सेवा क्षेत्र हे व्यावसायिक क्षेत्रातील/आर्थिक क्षेत्रातील तिसरे आणि शेवटचे क्षेत्र आहे. सेवा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा असा भाग आहे. ह्यात जनता उत्पादकता, कार्यान्विता, संभवनीयता आणि गरजा भागविण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करीत असतात, ज्यांना 'भावात्मक श्रम' (Affective Labour) असे परिभाषित केले जाते. ह्या क्षेत्राचे हे वैशिष्ट्य आहे की, ह्या क्षेत्रात वस्तू उत्पादनाच्या ऐवजी सेवा उत्पादित  केल्या जातात.सेवा ज्यांना स्पर्श करता येणाऱ्या वस्तू असेही म्हणतात, सेवा या क्षेत्रात विमा, वाहतूक, जाहिरात, संग्रहण आणि इतर सेवा, जसे : शिकवणे, आरोग्य सेवा, रेस्टॉरंट उद्योग, करमणूक क्षेत्र इत्यादींचा समावेश केला जातो. ह्या सेवा आर्थिक विकासासाठी अत्यंत वेळेचा महत्त्वाच्या ठरताततृतीय क्षेत्रात/सेवा क्षेत्रात खालील सेवा क्षेत्रांचा अंतर्भाव केला जातो :

 (1) संगणक आणि आय.टी.सेवा

(2) होटल आणि टुरिझम सेवा

(3) रेल्वे, बस, हवाई, जल वाहतूक

(4) संदेशवहन

(5) बँकिंग सेवा

(6) विमा सेवा

(7) पेन्शन सेवा

 (8) करमणूक

 (9) आदरातिथ्य/पर्यटन सेवा

 (10) शिक्षण

(11) व्यावसायिक सेवा, जसे : लेखांकन, कायदेविषयक, व्यवस्थापनविषयक इत्यादी

सेवांचा समावेश होतो. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी तृतीय क्षेत्रातील सेवांचे वर्गीकरण करून त्याचे आधारावर एक नवीन व्यवसाय/आर्थिक क्षेत्र विकसित केले. ह्या क्षेत्राला 'चतुर्थ क्षेत्र' (Quaternary Sector) असे म्हणतात. त्यामुळे आता व्यावसायिक तीन क्षेत्रांच्या ऐवजी चार क्षेत्रांमध्ये आर्थिक/व्यावसायिक क्षेत्र विभागण्यात आले आहे. चतुर्थ क्षेत्र (Quaternary Sector) हे ज्ञानावर आधारित असे सेवा क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रात आय.टी. (Information Technology), करमणूक माध्यमे (Media), संशोधन आणि विकास (Research and Development) तसेच ज्ञान आधारित सेवा, जसे : शिक्षण, वित्तीय नियोजन (Blogging), डिझाइनिंग अशा प्रकारच्या सेवांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.


Comments

Popular posts from this blog

PBO १.२ औद्योगिक क्रांतीचे परिणाम

1.3 बहुराष्ट्रीय कंपनी ( Multinational Corporation )

व्यवसाय संघटनेची स्वरूपे ( एकल व्यापार )