1.3 बहुराष्ट्रीय कंपनी ( Multinational Corporation )
प्रश्न :- बहुराष्ट्रीय कंपनीचा अर्थ स्पष्ट करून भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांना परवानगी देण्याची कारणे विशद करा.
MNC चे व्यूहरचनात्मक मुख्य कार्यालय जगाच्या कोणत्या तरी एका देशात असून ते व्यापारी कार्य मात्र जगातील विविध देशांमध्ये करीत असून जे आपला व्यवसाय आपल्या मूळ देशाबरोबर इतरही देशात उपक्रमाच्या नेटवर्कद्वारे आणि विपणन कार्यांद्वारे वाढवित असते.
भारतात बहुराष्ट्रीय कंपनीला परवानगी देण्याची कारणे ( Reasons towards Multinational Company in India) -
(१) विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे
(२) विना कर्ज भांडवलाच्या अंत:प्रवेशाची निर्मिती
(३) तांत्रिकतेची अदलाबदल
(४) निर्यातीला प्रोत्साहन
(५) पायाभूत उद्योगांमध्ये गुंतवणूक
(१) विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे -
आधुनिक काळात विकसनशील देशात बाह्य स्रोतांकडून होणारी मदत कमी झाली आहे. महत्त्वाचे कारण म्हणजे विकसित राष्ट्रे आपल्या GDP (Gross Domastic Product) पैकी सर्वात जास्त हिस्सा आपल्याच देशातील औद्योगिक क्षेत्रात गुंतवीत भारतात बहुराष्ट्रीय कंपनीला परवानगी देण्याची असल्यामुळे इतर राष्ट्रांना आर्थिक सहाय्य करण्यास ते उत्सुक नाहीत. बहुराष्ट्रीय कंपनी ही विदेशी चलनाची दरी भारतात विदेशी चलनात गुंतवणूक करून कमी करू शकतात. १९९१ च्या औद्योगिक धोरणातील उदारीकरणाच्या धोरणामुळे आता MNC's भारतात विदेशी चलनात गुंतवणूक करू शकतात, फक्त त्यांना काही अटींचे पालन करावे लागत. काही औद्योगिक क्षेत्रात १०० प्रतिशत निर्यातक्षम युनिट्सची स्थापना करण्यात परवानगी देण्यात आलेली आहे
(२) विना कर्ज भांडवलाच्या अंत:प्रवेशाची निर्मिती -
सरळ विदेशी गुंतवणुकीला परवानगी नाकारण्यात येत होती तेव्हा भारताला विदेशातून वाणिज्यिक कर्ज घेवून विदेशी भांडवलाची निर्मिती करावी लागत होती. ह्यामुळे भारतावरील कर्जाच्या, त्यावरील व्याजाच्या व त्याच्यासंबंधात सेवांच्या राशीत वर्षानुवर्षे वाढच होत होती. भारताच्या एकूण आयपैकी जवळपास ३५ प्रतिशत राशी विदेशी ऋणाच्या व व्याजाच्या शोधनात जात असे. ह्या परिस्थितीमुळे जगातील विकसित देशांमध्ये भारताची प्रतिमा थोडी काळवंडली होती. भारतात जर आपण विदेशी कंपन्यांना व्यवसाय करण्याकरिता प्रोत्साहन दिले तर ह्या कंपन्या भारतात विदेशी भांडवल आणतील आणि ह्या राशीतून भारत आपल्या विदेशी कर्जाची परतफेड करू शकेल. तसाच पुन्हा हाही एक विचार करण्यात आला की, जेव्हा ह्या कंपन्या आपल्या निर्यातीतून नफा मिळवतील, त्यापैकी काही हिस्सा विदेशी चलनाच्या रूपात भारताला मिळेल. म्हणजेच भारताच्या एकूण विदेशी चलनात वाढ होवून भारतावर असलेले विदेशी कर्ज भारत सहज परत करू शकेल व आपला विदेशी शोधनशेष अनुकूल करून घेईल.
(३) तांत्रिकतेची अदलाबदल -
बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारताला होणारा महत्त्वाचा फायदा म्हणजे ह्या कंपन्या आपल्या विकसित देशातून भारतात आधुनिक तंत्रज्ञान आणि तांत्रिक बाबी आणतील, ज्या भारतासारख्या विकसनशील देशात कामगारांची उत्पादन क्षमता वाढविण्यास आवश्यक असतात. त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाच्या आधारावर भारतीय कंपन्यासुद्धा आपल्या उपक्रमात उत्पादन करू शकतील. त्यामुळे औद्योगिक उत्पादनात वाढ होईल. ज्या वेळेस बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात संयुक्त साहस उपक्रम (Joint Venture) सुरू करतील तेव्हा ते आपल्यासोबत फक्त विदेशी भांडवल, यंत्रसामुग्रीच आणणार नाहीत; तर ते कुशल आणि कौशल्यप्राप्त कर्मचारीसुद्धा आणतील की ज्यांच्या ज्ञानाचा फायदा भारतीय कंपन्यांनासुद्धा मिळेल. ह्यामुळे भारतीय इंजिनीअर्सला ह्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती झाली व ते त्याचा उपयोग सुद्धा करू लागलेत.
(४) निर्यातीला प्रोत्साहन -
बहुराष्ट्रीय निगमांच्या जगातील विविध देशांशी असणाऱ्या संबंधामुळे ह्या कंपन्या सर्व देशांना मालाचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने उत्पादन करतील. त्यामुळे ह्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचा फायदा मिळेल.उत्पादन खर्च कमी येवून कमी किमतीवर ह्या कंपन्या जगातील विविध देशांना मालाचा पुरवठा करतील. त्यामुळे भारताची निर्यात वाढेल. भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. सामान्यतः ही गुंतवणूक अशा उद्योगधंद्यात करण्यात आली, जे उद्योगधंदे आपल्या उत्पादनाची निर्यात करीत असत.
जसे : Suzuki ह्या जपानी कंपनीने भारत सरकारसोबत 'मारुती उद्योग लि.' ह्या संयुक्त साहसी उपक्रमात फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. मारुती कार फक्त भारतातच विकल्या जात नाही, तर त्यांना विदेशातसुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे त्या विदेशातसुद्धा निर्यात केल्या जातात.
(५) पायाभूत उद्योगांमध्ये गुंतवणूक -
बहुराष्ट्रीय कंपन्यांची वित्तीय संसाधनांवर असणारी पकड आणि त्यांचा पुरेपूर असा उपयोग ह्यामुळे ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या भारतातील पॉवर प्रोजेक्ट, एअरपोर्ट, पोस्ट आणि रेल्वे यांचे आधुनिकीकरण, टेलिकम्युनिकेशन यासारख्या पायाभूत उद्योगांमध्ये गुंतवणूक करतील. पायाभूत उद्योगांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळेल व त्यामुळे भारतात आय आणि रोजगाराची निर्मिती होईल. त्याचा परिणाम म्हणजे देशाची आर्थिक प्रगती होईल. आताच्या सरकारच्या Common Minimum Programme नुसार अशी अपेक्षा करण्यात आलेली आहे की, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (Foreign Direct Investment : FDI) ही प्रामुख्याने (i) पायाभूत सुविधा (ii) उच्च तंत्रज्ञान (iii) निर्यात (iv) स्वदेशी संपत्ती आणि (v) रोजगार ह्या क्षेत्रात निश्चितच क्रांती करेल.
Comments
Post a Comment