नवीन सहस्राब्दिमधील भारतीय व्यवसाय
प्रश्न : नवीन सहस्राब्दिमधील भारतीय व्यवसायाचे भवितव्य स्पष्ट करा ?
(अ) उदारीकरण (Liberalisation) (ब) खाजगीकरण (Privatisation) (क) जागतिकीकरण (Globalisation)
֍ उदारीकरण आणि भारतीय व्यवसाय (Liberalisation and Indian Business) :
उदारीकरण किंवा आर्थिक उदारीकरण ही एक प्रक्रिया असून जी आर्थिक धोरण, नियम, प्रबंधकीय नियंत्रणे जी आर्थिक विकासास बाधा आणतात, ती कमी करणे किंवा ती पूर्णपणे दूर करणे असून त्याचेऐवजी देशासाठी अशा धोरणांचा, नियमांचा व कार्यपद्धती आणि प्रमाणांचा स्वीकार करणे होय, जे देशाच्या आर्थिक विकासास हातभार लावतील. उदारीकरण ही फार सर्वसमावेशक, व्यापक अशी संज्ञा असून देशाच्या उदारीकरण धोरणामुळे भारतीय व्यवसायाला भविष्यात अशा प्रकारे फायदे मिळणार आहेत.
(i) औद्योगिक लायसेंस आणि कोटा राज ही पद्धती संपुष्टात आली. त्यामुळे व्यवसायाची स्थापना करणे सहज सोपे झाले.
(ii) सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसायाच्या स्थापनेचा मार्ग सोपा झाला.
(iii) सार्वजनिक उपक्रमांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांचे खाजगीकरण केले.
(iv) आयात-निर्यातीवरील बंधने उठविले किंवा सैल केले.
(v) विदेशी विनिमय नियंत्रणे सैल केली.
(vi) सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय भांडवल बाजारातून आपले भांडवल गोळा करू शकतील.
֍ खाजगीकरण आणि नवीन सहस्राब्दिमधील व्यवसाय (Privatisation and Indian Business in New Millennium) :
सर्वसाधारण
शब्दात खाजगीकरण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील तसेच सरकारी क्षेत्रातील व्यवसाय चालविण्याकरिता व नियंत्रण करण्याकरिता खाजगी व्यक्तीकडे / संस्थांकडे सोपवणे
होय.
(i) जागतिक स्तरावर आणि व्यवसायाच्या जागतिक क्रियांवरील भांडवलाचा प्रवाह मुक्त करणे.
(ii) देशाच्या पायाभूत गरजा, विकास आणि सामाजिक कल्याण यासाठी निधीची निर्मिती करणे.
(iii) सार्वजनिक व्यवसायात आधुनिकता आणून त्यांना आधुनिक बनविणे.
(iv) रोजगारीच्या संधींची निर्मिती करणे.
(v) आर्थिक कार्यांवरील राजकीय प्रभाव दूर करणे.
(vi) प्रबंधकीय यंत्रणा आणि नोकरशाहीचा आकार कमी करणे.
(vii) व्यवसाय क्षेत्रातील सरकारचा हस्तक्षेप कमी करणे.
(viii) तरुणांमधील उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणे.
֍ जागतिकीकरण आणि नवीन सहस्राब्दिमधील भारतीय व्यवसाय (Globalisation and Indian Business in New Millennium) :
जागतिकीकरण हे खऱ्या अर्थाने अनिवार्य रूपातील नियमित जीवनाची एक पद्धती आहे, ज्यात नियमित व्यूहरचनाद्वारा जागतिक अर्थव्यव्यस्थेची निर्मिती आणि विकास होत असतो. ही मानसिक अशी एक प्रवृत्ती आहे, जिच्यात समग्र विश्वाला एकाच बाजाराच्या रूपात पाहिल्या जाते, ज्या जागतिक व्यावसायिक वातावरणाच्या गतिशीलतेच्या आधारावर व्यूहरचनेचा तसेच व्यावसायिक क्षेत्राचा विकास केला जातो.
(i) जागतिकीकरण हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर इतर सर्व देशांच्याअर्थव्यवस्थेला जोडत असते.
(ii) जागतिकीकरणात विभिन्न देशांच्या भौगोलिक परिसीमांच्या अंतर्गत व्यापारातील अडथळ्यांना दूर करून सर्व देशातील व्यापारासाठी जागतिक क्षेत्र उपलब्ध करून देते.
(iii) ह्यात विभिन्न देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये पुंजी, माल, सेवा, तांत्रिक ज्ञान इत्यादी संसाधनांवरील निर्बंध दूर करून त्यांचा स्वतंत्र प्रवाह सुनिश्चित केला जातो.
(iv) जागतिकीकरणामुळे विभिन्न राष्ट्रांमध्ये मानव संसाधनांच्या गतिशीलतेला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे अर्थव्यवस्था सुदृढ होण्यास मदत होते.
(v) जागतिकीकरणामुळे विचार, ज्ञान, संस्कृती ह्या सर्वांची जागतिक स्तरावर सहजतेने देवाणघेवाण होईल.

Comments
Post a Comment